कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेच्या वेळी महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात निधन झालेल्या चंदा भुकन यांच्या कुटुंबास विमा योजनेंतर्गत महापौर शीला शिंदे यांच्या हस्ते २ लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. कै. भूकन यांचे पती सुभाष यांनी तो स्वीकारला.
केंद्र सरकारची ही योजना असून त्यात अशा शस्त्रक्रियेमध्ये एखाद्या महिलेचे अकस्मात निधन झाले तर तिच्या कुटुंबियांना अशी मदत करण्यात येते. मनपाच्या वतीने विमा कंपनीकडे भूकन यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता मनपाकडूनही त्यांना मदत देण्यात येणार असून तसा प्रस्ताव तयार करून तो सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, डॉ. सतीश राजूरकर, सामाजिक कार्यकर्ते संजय ढोणे, नारायण इवळे आदी उपस्थित होते.     

Story img Loader