इंद्रायणी काठी.. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.. केतकी जुही गुलाब चंपक बन फुली.. कान्होबा तुझी घोंगडी चांगली.. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट.. राम का गुणगान करिये.. यांसारख्या अभंग आणि गीतांच्या माध्यमातून ‘स्वरभास्करा’चा सूर सवाई गंधर्व स्मारकामध्ये शुक्रवारी निनादला. पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक विचारांसह त्यांच्या मैफलींची दृश्ये पाहताना जणू पंडितजी आपल्याशी संवाद साधत असल्याची भावना श्रोत्यांची झाली.
हीरकमहोत्सवी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवातील अंतरंग उपक्रमांतर्गत ‘स्वरभास्कर’ हा पं. भीमसेन जोशी यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला. यामध्ये अशोक रानडे आणि श्रीराम पुजारी या समीक्षकांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील काही अंश, मन्ना डे, श्रीनिवास खळे यांनी पंडितजींच्या गायकीविषयी व्यक्त केलेल्या भावनांचा समावेश होता. पंडितजींचे बालपण, त्यांनी घेतलेला गुरूंचा शोध, त्यांची चित्रपट आणि नाटय़ क्षेत्रातील मुशाफिरी पाहताना पंडितजींच्या अष्टपैलूत्वाची प्रचिती आली. दिवेलागणीला सायंकाळी आई भजनं म्हणायची. तिच्यामुळेच मला गाण्याची गोडी लागली. सुसंस्कृत गायक होण्यासाठी मी किमान बी. ए. पदवी घ्यावी, अशी वडिलांची इच्छा होती. पण, शिक्षणामध्ये इतकी वर्षे का घालवायची म्हणून मी गायनाकडे लक्ष केंद्रित केले. इंग्रजी सहावीमध्ये असताना आलेल्या रेकॉर्डमधील उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांच्या ‘बसंत’ मधील चीजा ऐकून आपल्यालाही असे गाणे जमले पाहिजे असे वाटले, या आठवणी पंडितजींनी सांगितल्या आहेत. गुरू शोधासाठी केलेली भटकंती आणि जालंदर येथे पं. विनायकबुवा पटवर्धन यांनी माझी चौकशी करून सुचविलेले सवाई गंधर्व यांचे नाव, गुरुजींनी कठोर शिस्तीमध्ये दिलेले शिक्षण याचेही दर्शन घडते. दीड वर्षे केवळ गुरुसेवा केली. फक्त गंगुबाईंची शिकवणी ऐकण्यातून आणि गंगुबाईंना स्टेशनवर सोडण्यासाठी झालेल्या चर्चेतून मला शिक्षण मिळाले, असेही त्यांनी सांगितले आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलजार यांच्या दिग्दर्शनातून उलगडला
उस्ताद अमजद अली खाँ यांचा प्रवास!
‘फ्लॅशबॅक’ तंत्राच्या माध्यमातून कथनाद्वारे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचा प्रवास उलगडला. फिल्म्स डिव्हिजनची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन गुलजार यांनी केले आहे. उस्ताद हाफीज अली खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली तालीम, शुभलक्ष्मी यांच्याशी झालेला आंतरजातीय विवाह या आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. घरातील मी छोटा मुलगा असल्याचा फायदा म्हणजे मला खूप प्रेम मिळाले. पण, वडिलांच्या उमेदीच्या काळातील सरोदवादन मी ऐकू शकलो नाही हा तोटा आहे. मला तबलावादनाचा छंद होता. त्यामुळे मी सरोद सोडून तबलजी होईन, की काय याची वडिलांना चिंता होती. पित्याप्रमाणेच दरबारी हा माझा आवडता राग असल्याचे त्यांनी लघुपटातील मुलाखतीमध्ये सांगितले. यावेळी त्यांच्या मैफलीची काही दृश्ये रसिकांना पडद्यावर पाहता आली.

पंडितजींचे विचार
 गुरुजींनी केवळ तीन आकडय़ांचीच बिदागी पाहिली. चार आकडय़ात बिदागी त्यांना कधी मिळाली नाही. आता तबलजीच चार आकडय़ांमध्ये बिदागी घेतो.
 भीमसेन कसा झाला? उत्तम गाणं येत असतानाही वत्सलाबाईंनी गाणं सोडलं म्हणून मी भीमसेन झालो.
नवीन गायक दूरदर्शनला दूर ठेवणार नाहीत तोपर्यंत त्यांचे गाणे सुधारणार नाही.
 उत्तम परफॉर्मर हा चोर असला पाहिजे. सगळ्यांच्या गायकीतून उत्तम ते चोरायचे आणि चांगले करून आपल्या गळ्यातून मांडायचे.
 अनेकांना रियाझ आणि गायन यातील फरक कळतच नाही. गळ्यातील दोष दूर करण्यासाठी करायचा तो रियाझ. उत्तम गाणं जे की ते मैफलीमध्ये सादर करायचे.