सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन २०१२-२०१३ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उद्या (मंगळवारी) सकाळी आयोजित केला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची समारंभास प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी दिली.कारखान्याचे अध्यक्ष माधव कानवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात संचालक सर्वश्री चंद्रकांत कडलग, नानासाहेब शिंदे, हौशिराम सोनवणे, बाबासाहेब गायकर, संजय थोरात हे सपत्निक बॉयलरचे विधिवत पूजन करणार आहेत.जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहाणे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, पंचायत समितीच्या सभापती सुरेखा मोरे, नगराध्यक्ष दिलीप पुंड आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सभासद, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक अनिल शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.

Story img Loader