थंडीचा कडाका वाढला आहे आणि काहीसे उशिराने जायकवाडीत विदेशातून येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. भारताच्या उत्तरेकडून रशिया, मध्य रशिया, सबेरिया, युरोप आणि बलुचिस्तानातून येणारे काही पक्षी दिसू लागले आहेत. विशेषत: बदकाच्या १८ प्रकारच्या जाती या काळात येतात. देखणा फ्लेिमगोही दिसतो आहे. पण त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याची माहिती निसर्ग मित्रमंडळाचे दिलीप यार्दी यांनी दिली. गेल्या वर्षीही हे पक्षी काहीसे उशिरानेच आले होते, यावेळी तसेच वेळापत्रक असावे, असे सांगितले जाते.
 यंदा थंडी उशिरा सुरू झाल्याने ऑक्टोबरमध्ये येणारे पक्षी डिसेंबरच्या शेवटी पाणवठय़ावर येणास सुरुवात झाली आहे. पिनटेल, शॉवेलर, वीजन, कॉमन टील, ब्यू िवग टील, टफटेड पोचार्ड, या स्थलांतरीत बदकांची संख्या अधिक आहे. यातील पिनटेल या बदकाचे शेपूट टोकदार असते. शॉवलेटची चोच फावडय़ासारखी असते. वीजनच्या डोक्यावर एक पांढरा टिळा असतो, गंध लावल्यासारखा. तर टफटेड पोचर्ड या पक्ष्याच्या डोक्यावर शेंडी असते. दलदलीत राहणारे पक्षीही जायकवाडीत आवर्जुन येतात. यामध्ये ग्रीन शँक, रेड शँक, सॅडपायपर, स्टील्ट, करल्यु, रफ एॅन्ड रिव्ह, स्नाईप हे पक्षी आढळून येतात. दरवर्षी एन्व्हायमेंट रिसर्च फाऊडेशनतर्फे पक्षी निरीक्षण आणि त्यांची मोजणीही केली जाते. या रविवारी करण्यात आलेल्या मोजणीत १८ फ्लेिमगो आढळून आले. सुखना धरणावर केवळ ५ फ्लेिमगो दिसून आले. यंदा स्वॉलोप्फवर वा पाणिभगरी हा पक्षी अधिक संख्येने आला आहे. त्याचे थवेच्या थवे दिसतात. सोनेवाडी येथे ३ हजार पक्षी दिसून आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पक्षीगणना केली जाणार आहे.
प्रत्येक पक्ष्याचे वैशिष्टय़ निराळे असते. खाण्याच्या सवयी, अन्नसाखळी वेगळी असते. त्याचा अभ्यासही केला जात आहे. येत्या काही दिवसात आणखी काही पक्षी दिसू शकतील. पक्षी निरीक्षणासाठी दिलीप यार्दी दरवर्षी प्रशिक्षण वर्गही घेतात.

Story img Loader