कारंजा (लाड) तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्षी बचाव रॅली’ काढून समाजाला पक्ष्यांवर प्रेम करा, असा अभिनव संदेश दिला. विदर्भाचे तापमान वाढत असून पक्षी आणि छोटय़ा प्राण्यांच्या जीवाला धोका आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटले असल्याने पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा तृप्तीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर प्रेम करा, हा अभिनव संदेश समाजाला देण्यासाठी कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्षी बचाव रॅली’ काढली. यात विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक फलके हातात घेऊन गावातील आबालवृद्धांना या रॅलीत सहभागी करण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी पक्षी व प्राण्यांची पाणी पिण्याची सोय केली आहे. जिल्हा परिषद विद्यालयामध्येही अनेक ठिकाणी पाण्याची भांडी ठेवली असून या कार्यक्रमाचे प्रमुख शिक्षक गोपाल खाडे या कार्यासाठी सहकार्य करत आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय हरित सेनेचे प्रा. वरघट, स्काऊट पथकाचे वसंतराव चव्हाण यात सहकार्य करत आहेत. २०० विद्यार्थ्यांना भांडी वाटण्यात आली असून कामरगावात सर्वत्र पक्ष्यांची पाणी पिण्याची सोय झाली आहे.
कामरगावच्या विद्यार्थ्यांचा दिला पक्षीप्रेमाचा अभिनव संदेश
कारंजा (लाड) तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्षी बचाव रॅली’ काढून समाजाला पक्ष्यांवर प्रेम करा, असा अभिनव संदेश दिला. विदर्भाचे तापमान वाढत असून पक्षी आणि छोटय़ा प्राण्यांच्या जीवाला
First published on: 08-05-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds save rally from students in kamargaon