निघोजचे सरपंच संदीप वराळ यांच्या तिस-या अपत्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव कवाद यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास सुरू केले होते. मात्र ही नोंद करण्यात आल्याचा दाखला गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी दिल्यानंतर कवाद यांनी दुपारी उपोषण मागे घेतले.
कवाद यांनी सात दिवसांपूर्वी गटविकास अधिका-यांना निवेदन सादर करून निघोजचे सरपंच संदीप वराळ यांना तीन अपत्ये असून तिस-या अपत्याची त्यांनी ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली नसल्याची तक्रार केली होती. वराळ यांना दि. ३० जानेवारी रोजी तिसरी मुलगी झाली आह़े  ग्रामपंचायत सदस्यांनी वेगवेगळ्या अर्जांद्वारे ग्रामसेवकाकडे विचारणा करूनही ग्रामसेवकाने नोंद केली नसल्याचे कवाद यांचे म्हणणे होते. वराळ यांच्या दबावाखाली ग्रामसेवक नोंद करीत नसल्याचा आरोपही कवाद यांनी निवेदनात केला होता.
वराळ यांच्या तिन्ही अपत्यांचे जन्मदाखले आंदोलकांना देण्यात आले आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली व दुस-या पत्नीपासून एक मुलगा आहे. वराळ यांना दोन्ही पत्नींची एकूण तीन अपत्ये असल्याचे या कागदपत्रांवरून निष्पन्न होते. त्यामुळेच कायदेशीर गुंतागुंत आता वाढणार आहे. अलीकडेच वराळ यांनी ग्रामपंचायतीत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत सरपंचपद हिरावून घेतले होते. त्याच रोषातून वराळ यांची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले असून निघोजमधील राजकीय संघर्ष यापुढील काळात वाढण्याची शक्यता व्यक्त होते.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा