कार्टून मालिकांची सुरुवात झाली तेव्हापासून मिकी माऊस भारतीयांमध्येच नव्हे तर जगभर सर्वत्र अल्पावधीत लोकप्रिय झाला. या सर्वाच्या लाडक्या मिकी माऊसचा वाढदिवस डिस्ने वाहिनीवर रविवारी साजरा केला जाणार आहे. मिकी माऊसच्या वाढदिवसानिमित्त डिस्ने वाहिनीवर रविवारी अनेकविध कार्यक्रम दाखविले जाणार आहेत. त्यामध्ये सकाळी ९ वाजता मिकी माऊस क्लब हा कार्यक्रम पाहायला मिळेल.
डिस्ने वाहिनीवरच्या सर्व कार्यक्रमांमधील व्यक्तिरेखा मिकी माऊसचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. ‘दी थ्री मस्केटिअर्स’ या चित्रपटातून या व्यक्तिरेखा दुपारी १२ वाजता पाहायला मिळतील. या चित्रपटात मिकी माऊससोबत डोनाल्ड आणि गुफी हेही असतील. मिकी माऊसच्या चाहत्यांसाठी डिस्ने ज्युनिअर या वाहिनीवरही कार्यक्रम पाहता येतील. मिनीज बोटून्स, मासऊसकरसाईज हेही कार्यक्रम होतील. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत डिस्ने ज्युनिअरवर मिकी माऊसचा वाढदिवस साजरा होईल.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday of mickey mouse