केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आली. डॉ. अनभुले फौंडेशनच्या वतीने यानिमित्त केडगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाला ज्येष्ठ नागरिक भवनासाठी २ हजार चौरस फूट जागा देण्यात आली.
माजी आमदार दादा कळमकर यांनी डॉ. रावसाहेब अनभुले, तसेच नगरसेविका डॉ. क्रांतीकला अनभुले यांचे कौतूक केले. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून अशा प्रकारचे काम करणे ही दुर्मिळ गोष्ट झाली आहे. अनभुले परिवाराच्या वतीने मात्र सातत्याने असे उपक्रम राबवले जात असतात असे त्यांनी सांगितले. फौंडेशनने आयोजित केलेल्या विनामुल्य नेत्रतपासणी तसेच स्त्री रोग चिकित्सा शिबिरात २२४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला शारदा लगड, निर्मला मालपाणी, राजश्री मांढरे, अशोक बाबर, श्रीमती पवार, फिरोदिया, अजय दिघे, संभाजी गायकवाड, फारूक रंगरेज, शांताराम गाडे आदी उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिक रामराव चव्हाण, के. डी. खानदेशे, व. ह. जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. अनभुले यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने सिटी केअर रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांच्या हस्ते झाले. डॉ. रणजित सत्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी महापौर संग्राम जगताप, मनपाचे विरोधी पक्षनेते विनित पाऊलुबद्धे, शिशिर शिंदे, डॉ. संदीप सुराणा, डॉ. हेमा सुराणा, डॉ. रविंद्र भोसले आदी उपस्थित होते.
सर्जेपुरा येथे नादिर शेख यांच्या वतीने समाजसेवक पोपटशेठ बोरा यांच्या हस्ते मोहमंदिया असंघटित काम सेवाभावी संघटनेची स्थापना करण्यात आली. माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर संग्राम जगताप, समाजसेवक राजाराम भापकर, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सुर शेख, कलीम शेख, अन्वर खान, जाकीर शेख, शकूर शेख आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांना त्यांच्यासाठीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यासाठी सारसनगर येथील शिधापत्रिकाधारकांचे बँकेत खाते सुरू करण्याचा उपक्रम माजी महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश जोशी, तसेच श्रीमती पलाडे, ब्रम्हानंद राव, श्री. तुंगारे हे बँक व्यवस्थापक व अन्य अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर तालुक्यात जेऊर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. केशव बेरड, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, सोमनाथ धूत, भास्करराव मगर, किसनराव लोटके, अल्ताफ राजे, डॉ. कृष्णा बलदवा, डॉ. अर्जुन शिरसाट, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. अशोक कराळे, मयुरी शिंदे, डॉ. संतोष गिते, डॉ. शैलजा घुले उपस्थित होते.     

Story img Loader