महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपासून सुरू झालेली भाजपच्या विजयाची घौडदौड लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला थांबविता आली नाही. काँग्रेसविरोधात असलेल्या वातावरणाचा आणि नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा परिणाम म्हणून केवळ विदर्भात नाही तर देशात भाजपला यश मिळाले.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्षाने प्रयत्न केले. आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर पूर्तीवरून आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दमानिया यांना त्यात फारसे यश आले नाही. उलट त्यांची जमानत जप्त झाले. गडकरी आणि मुत्तेमवार यांच्या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष होते. मात्र, त्यामुळे काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. त्यांना त्यात यश आले नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्य़ात चांगले यश मिळाल्यानंतर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी बरेच प्रयत्न केले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीपासून जिल्ह्य़ाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरू झाली होती. प्रथम महापालिका, त्यानंतर जिल्हा परिषदेवर भगवा फडकावल्यानंतर भाजपने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूकही विक्रमी मतांनी जिंकली. त्यात नितीन गडकरी विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या मेट्रोरिजनच्या निवडणुकीत देखील भाजपला यश मिळाले होते.
सलग मिळविलेल्या अशा विजयानंतर आलेली लोकसभेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती व कुठल्याही परिस्थितीत संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरवर भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. शिवाय नरेंद्र मोदी यांची लाट देशभरात असल्यामुळे या निवडणुकीत भाजपला रोखणे काँग्रेसला शक्य झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यात होणाऱ्या पदवीधर मतदार संघाची आणि त्यानंतर होणारी राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत विजयी मिळवू असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.
विजयी परंपरा कायम राखण्यात भाजपला यश
महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपासून सुरू झालेली भाजपच्या विजयाची घौडदौड लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला थांबविता आली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-05-2014 at 01:05 IST
TOPICSभारतीय जनता पार्टीBJPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp continue victory maintain the tradition of success