चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला लागल्यावर चारही राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यावर आज भाजपा कार्यालयात खासदार, आमदार, पक्ष कार्यकर्ते जमले व त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा के ला. चंद्रपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मध्यप्रदेश, राजस्थान या दोन राज्यात भाजपाला निर्विवाद सत्ता मिळाली, तर छत्तीसगढ व दिल्ली येथे भाजपा सत्तेच्या निकट पोहोचत असल्याचे दिसत होते.
भाजपा कार्यालयासमोर त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्यात अनेक लोक सहभागी झाले. भाजपाच्या विजयाचे वृत्त जसजसे लोकांना समजत होते तस तसे लोकही उत्साहाने नमो नमो, असे नारे देत रस्त्यावरून फिरत होते. काही उत्साही कार्यकर्ते तर मोटरसायकलवर फिरून या क्षणाचा आनंद घेतांना दिसून आले.
शहराच्या माळीपुरा, पोळाचौक, डाबकीरोड, गौरक्षण रोड, कौलखेड, जठारपेठ, अकोट फाइल आदी ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने भाजपाच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेक ठिकाणी ढोलताशे बडवून मिरवणुका काढण्यात आल्या. भाजपा कार्यालयात खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजीत पाटील, शहराध्यक्ष डॉ .अशोक ओळंबे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, विजय अग्रवाल, नगरसेवक हरीश अलिमचंदाणी, रणधीर सावरकर, प्रतूल हातवळणे, अ‍ॅड.गिरीश गोखले, गिरीश जोशी आदी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. लोकांनी  खासदार व आमदारांचेही अभिनंदन केले.
चंद्रपुरात भाजपचा जल्ल्लोष
चंद्रपूर – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल चंद्रपूर शहर भाजपातर्फे कस्तुरबा चौकात सल्लोष साजरा करण्यात आला. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच फटाके फोडून हा आनंद साजरा करण्यात आला. भाजपाचे ध्वज फडकावत, फटाक्यांची आतषबाजी करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. हा विजय मोदींचा करिश्मा असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे व्यक्त केली. या वेळी तुषार सोम, किशोर जोरगेवार, राजीव गोलीवार, अंजली घोटेकेर, बलराम डोडानी, राहुल पावडे, माया उईके, ललिता गराट, सुषमा नागोसे, संदीप आगलावे, विशाल निंबाळकर, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बुलढाण्यात आनंदोत्सव
बुलढाणा – चार राज्यात भाजपला मिळालेल्या दणकेबाज विजयानंतर बुलढाणा शहर भाजपा-शिवसेनाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रॅली काढून व फटाकेची आतशबाजी करून जल्लोषात आनंदोत्सव जिल्हाभर साजरा केला. ग्रामीण व शहरात भाजपा विजयाचे वृत्त धडकताच कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
बुलढाणा, मेहकर, चिखली, देऊळगावराजा येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. विजयाच्या जल्लोषात भाजपाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.व्ही.डी.पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धिरज लिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, तालुका अध्यक्ष सखाराम नरोटे, भगवान एकडे, शहराध्यक्ष अ‍ॅड.अमोल बल्लाळ, आदींसह भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा