भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया जिल्ह्य़ात सुरू झाली आहे. आज नगरला झालेल्या पक्षाच्या बैठकीत येत्या दि. २९ पर्यंत तालुकानिहाय स्थानिक समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यासाठी तालुका निरीक्षकही नियुक्त करण्यात आले.
संघटनात्मक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल सावे यांच्या उपस्थितीत आज येथे पक्षाची बैठक झाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा सरचिटणीस प्रा. भगवान बेरड आदी यावेळी उपस्थित होते. येत्या दहा दिवसात स्थानिक समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तालुकानिहाय नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक पुढीलप्रमाणे आहेत. नगर शहर- प्रताप ढाकणे, नगर तालुका- अभय आगरकर, पारनेर- विक्रम तांबे, राहुरी- सचिन पारखी, श्रीगोंदे- सुनिल रामदासी, पाथर्डी- जालिंदर वाकचौरे, श्रीरामपूर शहर- नितीन कापसे, ग्रामीण- जगन्नाथ निंबाळकर, कोपरगाव शहर- अल्लाद्दीन काझी, ग्रामीण- उदय ठोंबरे, संगमनेर शहर- प्रकाश चित्ते, ग्रामीण- अनिल मोहिते, शेवगाव व कर्जत- भानुदास बेरड, जामखेड- राजेंद्र म्हस्के, नेवासे- बाळासाहेब पोटघन आणि अकोले- नामदेव राऊत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा