कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, महिला व सामान्य नागरिक यापैकी कु णीही सुखी नाही. शासनाच्या नाकर्तेपणामुळे व चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भस्मासूर वाढत आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार व घोटाळ्यांनी कहर केला आहे. अशा परिस्थितीत या सरकारला चले जाव ठणकावून सांगण्यासाठी भाजप उद्या, ११ डिसेंबर रोजी नागपूरला राज्य घालणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या राज्य महिला मोर्चाने पुणे ते नागपूर अशी संग्राम रॅली काढली आहे.
या संग्राम रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष नीता केळकर यांनी दिली.
त्यांच्या नेतृत्वातील संग्राम रॅलीचे शहरात व जिल्ह्य़ात आगमन झाले. त्यानंतर येथील विश्राम भवनात पत्रकारांशी बोलतांना केळकर म्हणाल्या की, आघाडी शासनाने साधे गॅस सिलिंडर देण्यासाठी नागरिकांची थट्टा चालविली आहे.
 महागाईचा भस्मासूर वाढला आहे. सिंचनाचा सत्तर हजार रुपयाचा घोटाळा झाल्यानंतरही राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी निर्लज्जपणे पुन्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. दुष्काळ, पाणीटंचाई, चाराटंचाई, सोयाबीन व कापसाचे पडलेले भाव, हवालदिल झालेला शेतकरी, असुरक्षित महिला व असंवेदनशील सरकार यामुळे
संपूर्ण जनता वाऱ्यावर आहे.
आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी उद्या, ११ डिसेंबर रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. या आंदोलनाला भरभक्कम करण्यासाठी महिला मोर्चाने संग्राम रॅली काढली आहे.
पुण्यातून या रॅलीचा प्रारंभ झाला असून ती विदर्भाच्या प्रमुख जिल्ह्य़ााह नागपूरला पोहोचेल. या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या संग्राम रॅलीच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार महिला घेराव आंदोलनात सहभागी होतील व सरकारला पळता भूई थोडी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महिला आघाडीच्या विजया राठी, वैशाली डाबेराव, प्रभाताई क विमंडन  यांच्यासह प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, आमदार चैनसुख संचेती, नंदुभाऊ अग्रवाल, दत्ता गवळी पाटील, राजेंद्र खरात, मयुर पातुरकर, डॉ. अजाबराव सावळे, पंडितराव सपकाळ, कुणाल कुळकर्णी यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, नेते  आणि मोठय़ा संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा