शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारने पुरती डोळेझाक केली आहे. शेतमालाचा भाव, सिंचनासाठी पाण्याचे दुर्मिक्ष्य, रब्बीच्या हंगामात वीज वितरण कंपनीकडून होत असलेली चेष्टा या सर्व गंभीर प्रश्नांसाठी भाजपा येत्या ७ डिसेंबरला २९ कि.मी.चा लाँगमार्च काढणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष  राजेंद्र डांगे यांनी आज येथे दिली. स्थानिक जिल्हा भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डांगे यांनी आयोजित लॉंगमार्च हा तरोडा ते यवतमाळ दरम्यान राहणार असल्याचे सांगितले.
 यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनोज इंगोले, माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, अजय बिहाडे, माजी नगरसेवक अमोल ढोणे, सुनील समदुरकर, अमर दिनकर, आर्णी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब चावरे आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांनी १२-१२-१२ रोजी संपूर्ण महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करू, अशी मुक्ताफळे उधळली होती. मात्र, लोडशेिडग आणखी मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. रब्बीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पंपाची वीज जोडणी कापली जात आहे. बियाणे व खतांच्या किमती तिप्पट प्रमाणात वाढल्या आहेत. या बाजारात खुलेआम िलकिग सुरू आहे. अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीनचे पीक वाया गेले. मात्र, आता रब्बीमध्येही वीज वितरण कंपनी व सरकार शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहे, याबाबत राजेंद्र डांगे यांनी संताप व्यक्त केला.
येत्या ७ डिसेंबरला भाजपाचे खासदार हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ-आर्णी मार्गावरील तरोडा येथून सकाळी ८ वाजता लांॅगमार्चला सुरुवात होईल. या लॉंगमार्चमध्ये राजाभाऊ ठाकरे, मदन येरावार, बाबासाहेब गाडे पाटील, उध्दव येरमे, दिवाकर पांडे यांच्यासह आर्णी, घाटंजी व यवतमाळ या तालुक्यातील शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
दुपारी ३.३०च्या दरम्यान यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असे डांगे यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा