शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप-सेना युतीच्या वतीने काढण्यात येणारा महामोर्चा रद्द करण्यात आला आहे.
आमदार शिवाजीराव कर्डिले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी ही माहिती दिली. दुष्काळी स्थितीचा सामना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश, बंद केलेल्या छावण्या तसेच चारा डेपो पुन्हा सुरू करावेत, बुऱ्हाणनगर, तसेच मिरी-तिसगाव या पाणी योजना सुरू कराव्यात, अन्यथा त्यांच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत या मागणीसाठी भाजप-सेना युतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर १७ नोव्हेंबरला महामोर्चा काढण्यात येणार होता. सेनाप्रमुख ठाकरे यांची प्रकृती ठिक नाही, अशा स्थितीत मोर्चा काढणे अयोग्य असल्याने मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sena big morcha were cancelled