जिल्ह्य़ातील दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय यंत्रणा अयशस्वी ठरत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर यांनी केला. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ परतूर व मंठा तालुक्यांतील १२ गावांमध्ये भाजपतर्फे पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा लोणीकर यांनी केला. दुष्काळ निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात यंत्रणा उदासीन आहे. दुष्काळी स्थिती व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत १० बळी गेले आहेत. पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मंठा तालुक्यातील पेवा गावामधील दोन मुली बुडून मृत्युमुखी पडल्या. पेवा ग्रामपंचायतीने पाण्याचे टँकर व विहीर अधिग्रहणाची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. रोजगार हमीवरील मजुरांना १५ दिवसांत कामाचा मोबदला द्यावा, असा नियम आहे. परंतु ५ महिने झाले, तरी रोजगार हमी योजनेतील मजुरांना कामाचा मोबदला मिळाला नाही. परतूर व मंठा तालुक्यांतील ९२ गावांचा आपण दौरा केला. ग्रामस्थांचे कामासाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत असल्याचे दिसून आले, असेही लोणीकर म्हणाले. दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या निषेधार्थ आज परतूर, मंठा, सातोना, आष्टी, तळणी आदी १२ गावांत बंद पाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परतूर, मंठा तालुक्यांत भाजपचा ‘बंद’ यशस्वी
जिल्ह्य़ातील दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय यंत्रणा अयशस्वी ठरत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर यांनी केला. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ परतूर व मंठा तालुक्यांतील १२ गावांमध्ये भाजपतर्फे पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा लोणीकर यांनी केला. दुष्काळ
First published on: 22-03-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp strick sucess in partur mantha distrect