जिल्ह्य़ातील दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यात प्रशासकीय यंत्रणा अयशस्वी ठरत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर यांनी केला. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ परतूर व मंठा तालुक्यांतील १२ गावांमध्ये भाजपतर्फे पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा लोणीकर यांनी केला. दुष्काळ निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात यंत्रणा उदासीन आहे. दुष्काळी स्थिती व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे जिल्ह्य़ात आतापर्यंत १० बळी गेले आहेत. पाण्यासाठी विहिरीत उतरलेल्या मंठा तालुक्यातील पेवा गावामधील दोन मुली बुडून मृत्युमुखी पडल्या. पेवा ग्रामपंचायतीने पाण्याचे टँकर व विहीर अधिग्रहणाची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केले. रोजगार हमीवरील मजुरांना १५ दिवसांत कामाचा मोबदला द्यावा, असा नियम आहे. परंतु ५ महिने झाले, तरी रोजगार हमी योजनेतील मजुरांना कामाचा मोबदला मिळाला नाही. परतूर व मंठा तालुक्यांतील ९२ गावांचा आपण दौरा केला. ग्रामस्थांचे कामासाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत असल्याचे दिसून आले, असेही लोणीकर म्हणाले. दुष्काळ निवारण कार्यक्रम राबविण्यास प्रशासन असमर्थ ठरत असल्याच्या निषेधार्थ आज परतूर, मंठा, सातोना, आष्टी, तळणी आदी १२ गावांत बंद पाळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा