गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.. नितीन गडकरी आगे बढो.. देश का नेता कैसा हो,  गडकरी जैसा हो.. अशा घोषणा देत ढोल-ताशांच्या निनादात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केक कापून नितीन गडकरी यांचा ५७ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. आज महालातील गडकरी वाडयाच्या परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.
राज्यातील दुष्काळी परिस्थिीमुळे कुठलेही हारतुरे, सत्कार न स्वीकारता वाढदिवस साजरा करण्याचे सक्त निर्देश दिल्यानंतरही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आप्तेष्टांनी आज सकाळपासून गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी वाडय़ावर गर्दी केली होती. आज सकाळी देवाची पूजा केल्यानंतर गडकरींनी घरी आलेल्या काही ज्येष्ठ मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात आलेल्या सवार्ंच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाने कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विविध समाजातील नागरिक यावेळी गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.  परिसरात अभिनंदन आणि शुभेच्छा देणारे मोठे पोस्टसर्स लावण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी आणि युवा मोर्चातर्फे ५७ किलोचा केक आणण्यात आला होता.
गडकरी यांना शुभेच्या देण्यासाठी वाडय़ावर सकाळपासून कार्यकर्त्यांची जणू रीघ लागली होती. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, महापौर अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, खासदार अजय संचेती, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकरराव देशमुख, विकास कुंभारे, सुधीर पारवे, विजय घोडमारे, जयकुमार वर्मा, अशोक मानकर, उदयभास्कर नायर, मितेश भांगडिया, पदमेश गुप्ता, अरुण लखानी, रवी बोरटकर, दीपक सप्तर्षी,  जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे, उमहापौर संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, अविनाश ठाकरे, प्रवीण दटके, बंडू राऊत, अर्चना डेहनकर, रामभाऊ अंबुलकर, बळवंतराव ढोबळे यांच्यासह उद्योजक, पूर्तीमधील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी  आले होते.
पुष्पगुच्छ आणि हारतुरे आणू नयेत, असे आवाहन केल्यानंतरही अनेक लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ आणले होते. देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांना तुळशीचे रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचे निमित्त साधून शहरातील विविध भागात मोठेमोठे होर्डिग्ज लावण्यात आले होते. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मोर्चा आणि काही सामाजिक संघटनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.