नागपूर विधानसभेवरील मोर्चाच्या जनजागृतीसाठी पुण्याहून निघालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या संग्राम रॅलीचा चोंडी (ता. जामखेड) येथे काल दुपारी मेळावा झाला. त्यानंतर नगरमध्ये आलेल्या या रॅलीचे हॉटेल पंचवटी येथे उपमहापौर गीतांजली काळे यांनी स्वागत केले.
आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष नीता केळकर, महामंत्री माधवी नाईक, उमाताई खरे, माजी आमदार रूपलेखाताई ढोरे, तसेच अन्य राज्य पदाधिकारी या रॅलीचे नेतृत्व करत आहेत. श्रीमती केळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टिका करून आता महिलांनी जागे होऊन या सरकारला धडा शिकवल्याशिवाय ते जागेवर येणार नाहीत असे सांगितले. उपमहापौर काळे यांनी नागपूर मोर्चासाठी नगर जिल्ह्य़ातून अनेक महिला उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाध्यक्षा सुरेखा विद्ये, उपाध्यक्षा शैला सामंत, तसेच जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे, नगरसेविका संगीता खरमाळे, जिल्हा उपाध्यक्षा छायाताई राजपूत, विशाखा पटेल, शहराध्यक्षा आशाताई विधाते, सविता तागडे, कल्पना पंत, कुमुदिनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा