येथील शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीवेळी दहावी व बारावी परीक्षेस शिक्षण संस्थाचालकांनी पुकारलेल्या असहकार भूमिकेविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर शिक्षण उपसंचालक बी. बी. पायमल यांनी असहकार्याच्या भूमिकेत फेरबदल करून संस्थाचालकांकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल. परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडली जाईल, अशी ग्वाही दिली.
शिक्षण संस्थाचालक व संबंधित संघटना शिक्षक संचालक यांनी दहावी-बारावी परीक्षेस जागा, इमारत न देणे आणि शिक्षकांद्वारे परीक्षेस असहकार्य करणे असा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा घातक निर्णय घेऊन विद्यार्थी त्यांचे पालक यांना चिंतेत टाकले आहे. याप्रश्नी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिक्षण उपसंचालक बी. बी. पायमल यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने चर्चा केली. संबंधित शिक्षण संस्था, संस्थाचालक यांच्यासोबत बैठक आयोजित करून आक्षेप नोंदवला. या वेळी शिक्षण उपसंचालक यांनी बैठकीचा विषय व सरकारची भूमिका मांडली.     
या वेळी भाजपचे उपाध्यक्ष विजय जाधव यांनीही संस्थाचालकांच्या भूमिकेवर टीका केली. सर्वाचे म्हणणे ऐकून पायमल यांनी उपरोक्तप्रमाणे कार्यवाही करण्याची आश्वासन दिले.   
या वेळी भाजपचे उपाध्यक्ष संतोष भिवटे, अशोक देसाई, गणेश देसाई, दिलीप मैत्राणी, युवा मोर्चाचे संदीप देसाई, डॉ. शेलार श्रीकांत घुंटे, मधुमती पावनगडकर आदी उपस्थित होते.

Story img Loader