महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना उद्या (मंगळवारी) नगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल बेछूट वक्तव्य करणाऱ्या ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
ठाकरे यांनी सोलापूर येथील सभेत केवळ उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध अशोभनीय वक्तव्य केले नाही तर महिलांना लज्जा होईल असेही हावभाव करुन महाराष्ट्राच्या संकृतीला काळिमा फासली, त्यामुळे ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना दिले. पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास मनसेने चौकात लावलेला आक्षेपार्ह मजकुराचा फलक दृष्टीस पडला. ‘हिंमत असेल तर अडवून दाखवा’ असा मजकूर त्यावर ठाकरे यांच्या छायाचित्रासह होता. हा फलक हटवावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी बारकुंड यांच्याकडे केली. बारकुंड यांनी तशा सुचना तोफखाना पोलिसांना दिल्या. नंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गेलेल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात सुमारे अर्धातास ठिय्या आंदोलन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा