शालेय पोषण आहार योजनेतील साडेआठ लाख रुपये किमतीच्या तांदळाचा काळाबाजार प्रकरणी फरारी असलेल्या नांदेडच्या किशोर शर्मा यास अटक करण्यात आली. त्याला सोमवापर्यंत (दि. १४) पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीत असलेल्या आठजणांना जामीन मिळाला. राजस्थानमधील चार आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.
जिल्ह्यात पोषण आहार योजनेतील गहू व तांदळाचा काळाबाजार वाहतूक कंत्राटदाराच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. गेल्या ३ ऑक्टोबरला रात्री परभणीत पोषण आहाराच्या तांदळाच्या दोन मालमोटारी पकडल्यानंतर १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन मालमोटारी, दोन मोटारी व आरोपीकडून ६ लाख रुपये रक्कम जप्त केली. सर्व आरोपी कोठडीत असताना चौकशीदरम्यान आरोपींच्या घरातून मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांचे बनावट शिक्के जप्त करण्यात आले.
पोषण आहार योजनेतील गहू-तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटमध्ये काही मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांचाही सहभाग असावा, या संशयावरून पोलिसांनी त्यांचीही चौकशी सुरू केली. किशोर शर्मा यास गुरुवारी अटक झाली.
पोषण आहार काळाबाजार
शालेय पोषण आहार योजनेतील साडेआठ लाख रुपये किमतीच्या तांदळाचा काळाबाजार प्रकरणी फरारी असलेल्या नांदेडच्या किशोर शर्मा यास अटक करण्यात आली. त्याला सोमवापर्यंत (दि. १४) पोलीस कोठडी देण्यात आली.
आणखी वाचा
First published on: 12-10-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black market of nutrition food