शहरातील अतिरिक्त एमआयडीसीतील गजराज स्टील फॅक्टरीत सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन दोघे जखमी झाले. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजराज स्टीलचे मालक महेश मलंग यांनी सांगितल्यानुसार फॅक्टरीत स्टीलचे उत्पादन केले जाते. नेहमीप्रमाणे बॉयलर सोमवारीही सुरू होता. दुपारी बाराच्या सुमारास बॉयलरमधून वाफ बाहेर येत असल्याचे कामगारांच्या लक्षात आल्यामुळे कामगार सुरक्षित अंतरावर पोहोचले. मात्र, दोन ऑपरेटरला खाली उतरता आले नाही. त्यामुळे एक वाफेने भाजला. आणखी एका कामगाराच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक बी. जी गायकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करण्यात आली.

Story img Loader