भिवंडी येथील कलानगरमध्ये घंटागाडीत कचरा भरत असताना कचरा खाली पडून झालेल्या स्फोटात पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने येथील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात हा स्फोट सुतळी बाँम्बचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
देऊनगर येथे सकाळी १०.३० वाजता टावरे कंपाऊंड येथे कचरा उचलण्यासाठी घंडागाडी आली होती. यावेळी कचरा उचलत असताना यातील काही कचरा खाली पडून अचानक त्याचा स्फोट झाला.
यावेळी कचरा उचलणारे पाच कर्मचारी जखमी झाले. अमोल तांबे, रुपेश भोईर, रामदास जाधव, मोहन गायकवाड आणि इम्तियाज अन्सारी अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी हा स्फोट सुतळी बाँम्बचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader