गॅस टाकीचा स्फोट झाल्याने नेवासे रस्त्यावरील कुणाल सायकल व मोबाईल शॉपी या दुकानास आग लागून ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. पालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझविली. विजयकुमार ताराचंद लुक्कड यांच्या मालकीच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या घरात काल पहाटे गॅस टाकीचा स्फोट झाला. त्यावेळी घरात लुक्कड व त्यांच्या पत्नी पुष्पा या झोपलेल्या होत्या. आग लागल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले. त्यांना आजूबाजूच्या लोकांनी बाहेर काढले. त्यात लुक्कड भाजले गेले. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुकानाच्या पत्र्यावर टायर टाकलेले होते. त्यामुळे, आग भडकली, तसेच घरातील व दुकानातील विजेचे शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे दुकान व घर एकाच वेळी आगिने वेढले गेले. दुकानातील सायकलचे स्पेअर्स पार्ट, मोबाईल, घरातील सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, तसेच संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले. तहसीलदार अनिल पुरे, पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा