राऊंड टेबल इंडियाच्यावतीने रविवारी ‘बीएमआर – २०१२’ या ब्लाईंड नेव्हीगेशन कार रॅलीचे आयोजन केाले आहे. अंध बांधवांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने चालकाला मार्ग दाखवणे व निर्धारित वेळेत निर्धारित स्थानावर पोहोचणे, अशी या रॅलीची संकल्पना आहे.
सिटी सेंटर मॉल येथून रॅलीस प्रारंभ होईल. त्यानंतर शहरातील सुमारे ७० किलोमीटरचा प्रवास वाहनचालकास अंध बांधवाच्या ब्रेल लिपीवर दिलेल्या मार्गाने करावा लागणार आहे. प्रत्येक वळणाला व ठराविक अंतरावर वेळेचे नियोजन केलेले आहे. स्पर्धकाने निर्धारित वेळेत निर्धारित स्थानावर पोहोचणे, ही या रॅलीची खासियत आहे. राऊंड टेबल इंडिया ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असून राष्ट्रीय स्तरावर ३०० टेबल्स कार्यरत आहेत. संस्थेचा उद्देश हा ‘फ्रिडम थ्रू एज्युकेशन’ आहे. संस्थेच्या उपक्रमाद्वारे सात लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. या शिवाय गुजरामधील भूकंप, सुनामीमुळे झालेली वाताहत अशा नैसर्गिक संकटावेळी संस्थेने मदत उभारणी केली आहे. नाशिक विभागात नाशिक लेडीज सर्कलच्या माध्यमातून महिलाही या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.
नाशिककरांनी मोठय़ा संख्येने आपल्या वाहनांसह सहभागी व्हावे व सहभागासाठी जिग्रेश गोडा ९८२३०३३८०९, क्षितीज अग्रवाल ९९२३३ ०२४०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.    

Story img Loader