भारतीय सुदर्शन समाज नागपूर शहर व युवा मंचातर्फे संत सुदर्शन जयंती सप्ताह साजरा केला जात असून यानिमित्ताने २ डिसेंबपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
२९ नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी १२ वाजता गंगाबाई घाट, कॉर्पोरेशन कॉलनीत नेत्र चिकित्सा शिबीर आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल. आमदार विकास कुंभारे, नगरेसवक अनिल धावडे यावेळी उपस्थित राहतील.
सुदर्शन महाराजांच्या मूर्तीची स्थापना शुक्रवारी पाच वाजता सिरसपेठेत करण्यात येईल.
यावेळी नगरसेवक रवींद्र भोयर, आमदार दीनानाथ पडोळे, नगरसेवक सारिका नांदुरकर, वसंत भगत उपस्थित राहतील.
शनिवारी दर्शन कॉलनीत सुदर्शन जयंती आणि सत्कार कार्यक्रम नगरसेवक हरीश डिकोंडवार, नगरसेवक मालू वनवे, कामठी नगर परिषदेचे सदस्य रंजीत सफेलकर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबुराव वामन यांच्या उपस्थितीत
होईल. जिल्हास्तरीय कुस्तीही यानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. समारोपाच्या कार्यकमाला माजी खासदार दत्ता मेघे, गिरीश पांडव, सुरेंद्र मनपिया, प्रशांत धवड आदी उपस्थित राहतील, अशी माहिती गौरीशंकर ग्रावकर यांनी दिली. यावेळी अजय हाथीबेड, राजीव बारसे, प्रदीप महतो, सुरेश खरे आदी उपस्थित होते.    

Story img Loader