न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, मात्र त्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या प्रार्थनास्थळांबाबत हरकती आणि सूचना मागविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता नागरिकांना २२ एप्रिलपर्यंत पालिकेकडे हरकती आणि सूचना पाठविता येतील. सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीला किंवा इतर गोष्टींना अडथळा ठरणाऱ्या ७४२ स्थळांपैकी ५३४ स्थळे पाडण्याचा आणि २०८ धार्मिक स्थळे नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पदपथावर, रस्त्याच्या मध्यभागी अथवा सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत प्रार्थनास्थळे उभारण्यात आली आहेत. ही प्रार्थनास्थळे वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरत आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रार्थनास्थळांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनधिकृत प्रार्थनास्थळे हरकती-सूचनांसाठी २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, मात्र त्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडलेला नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या प्रार्थनास्थळांबाबत हरकती आणि सूचना मागविण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
First published on: 19-02-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc extended to reply of notice till 22 april for illegal pray place