उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या ‘गणेश गौरव’ पुरस्काराचा मान धारावीतील ‘श्री हनुमान सेवा मंडळाला मिळाला आहे. परळ येथील ‘महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला दुसरा तर विलेपाल्र्याच्या ‘पेशवा मंडळा’ने तिसरा क्रमांक पटकावला. अवयवदानाबाबत जागृती करणाऱ्या ‘बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे हे पहिलेच वर्ष आहे.
या स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून शहरातील ८३ मंडळांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत १९ मंडळांची निवड झाली होती. ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षण पार पडले. सोमवारी महापौर व उपमहापौर यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आले. बोरिवली येथील बालविकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसाठी अशोक म्हात्रे यांना उत्कृष्ट मूर्तीकाराचा पुरस्कार जाहीर झाला. उत्कृष्ट नेपथ्यासाठीचा पुरस्कार प्रशांत दळवी यांना विक्रोळी येथील बाल मित्र कला मंडळाच्या देखाव्यासाठी मिळाला. वरळी नाका येथील विजेता विकास मित्रमंडळाला शाडू मातीच्या सवरेत्कृष्ट मूर्तीसाठी गौरवण्यात येईल.
खेतवाडी खंबाटा गल्ली मंडळ, श्री सिद्धिविनायक मंडळ, अंधेरी, उज्ज्वल सेवा संघ, भांडुप, जय हनुमान मंडळ, कांदिवली, विठ्ठल मंदिर गणेशोत्सव मंडळ, दहिसर यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. खेतवाडी ४ थी गल्ली, मापलावाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, माझगाव, विघ्नहर्ता रहिवाशी मित्रमंडळ, बोरिवली यांची पर्यावरणस्नेही मंडळ म्हणून निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा