डोंबिवलीत विनापरवाना रिक्षा चालविल्याच्या प्रकरणात यापूर्वी नीलेश गायकवाड या आरोपीला अटक केली आहे. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक भंगार रिक्षा सादर करून ती मूळ विनापरवाना रिक्षा असल्याचे दाखविणारा बरकत अली अन्सारी (वय ४५, रा. बैलबाजार, कल्याण) याला अटक केली आहे. या प्रकरणातील एक दलाल प्रशांत चव्हाण याला न्यायालयाचा अंतरिम जामीन मिळाला आहे.
एका अपंगाच्या नावे असलेली रिक्षा नीलेश डोंबिवलीत चालवीत होता. या बदल्यात नीलेश अपंगाला वर्षांला सुमारे ३० हजार रुपये देत होता.
अपंगाने आपली रिक्षा आपणास परत करावी म्हणून नीलेशला गळ घातली. या वेळी नीलेशने अपंगाचे न ऐकताच अपंगाची रिक्षा (एमएच-०५-एस-८६३८) असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांना भासविले.
त्या ठिकाणी गॅरेजवाला जाफर याच्याकडून आणलेली रिक्षा तोडण्यात आली. अपंगांच्या रिक्षेवर नव्याने परमिट घेण्यात नीलेशला यश आले. आपल्या रिक्षाच्या परमिटची मुदत संपली असताना नीलेश शहरात रिक्षा कशी चालवितो म्हणून अपंगाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात अर्ज केला. त्यावरून पोलिसांनी प्रथम नीलेशला अटक केली, मग पुढील घोटाळा उघड होत चालला आहे.
बरकत अन्सारीची गेल्या २३ वर्षांची एमएच-०४-डी-४८२१ क्रमांकाची भंगार रिक्षा आरटीओ कार्यालयात अपंगाची रिक्षा म्हणून सादर करण्यात आली. बरकतच्या भंगार रिक्षावरील डॅश बोर्ड, नंबर फलक बदलण्यात आला. मग नवीन परमिट मिळविण्यात नीलेश यशस्वी झाला असल्याचे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
‘आरटीओ’ला बोगस रिक्षा सादर करणारा अटकेत
डोंबिवलीत विनापरवाना रिक्षा चालविल्याच्या प्रकरणात यापूर्वी नीलेश गायकवाड या आरोपीला अटक केली आहे. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला एक भंगार रिक्षा सादर करून ती मूळ विनापरवाना रिक्षा असल्याचे दाखविणारा बरकत अली अन्सारी (वय ४५, रा. बैलबाजार, कल्याण) याला अटक केली आहे.
First published on: 23-04-2013 at 02:11 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus auto presenter to rto arrested