ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या नगरसेविका चांदणी भरत दुराणी यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चांदणी दुराणी यांच्याविरोधात काँग्रेसच्या तिकीटावर अ‍ॅड अरुणा भुजबळ यांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीनंतर भुजबळ यांनी दुराणी यांच्या जात प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  दरम्यान, न्यायालयाने व कोकण विभागीय जात पडताळणी समितीने दुराणी यांचे जात प्रमाणपत्र नुकतेच अवैध ठरविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा