सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘अय्या’ चित्रपटात राणी मुखर्जी मराठी मुलीच्या भूमिकेत दिसणार असून आता अभिनेता शाहिद कपूर हाही मराठी तरुणाची प्रमुख भूमिका ‘फटा पोस्टर निकला हिरो’ या राजकुमार संतोषी दिग्दर्शित आगामी चित्रपटात
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणारा अस्सल मराठी तरुण शाहिद कपूरला साकारायचा असून राज्याच्या ग्रामीण किंवा निमशहरी परिसरातीलअस्सल मराठी कुटुंबातील तरूण उभा करण्यासाठी त्याने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती निर्माता कुमार तौरानी यांनी दिली. या चित्रपटाचे चित्रीकरण एक नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील स्टुडिओत केले जाणार आहे. आशा भोसले अभिनयात पदार्पण करणार असलेल्या ‘माई’ या हिंदी चित्रपटात आशा भोसले यांच्या मुलीची भूमिका पद्मिनी कोल्हापुरेने साकारली असून ‘फटा पोस्टर निकला हिरो’मध्ये ती शाहिदच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत उर्मिला मातोंडकर, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी यांनी मराठी तरुणीच्या भूमिका साकारल्या असून अक्षय कुमारने ‘खट्टा मीठा’ या २०१० सालच्या चित्रपटात सचिन टिचकुले हा मराठी नायक साकारला होता. तर अभिनेत्री असीन हीसुद्धा ‘खिलाडी ७८६’ या आगामी चित्रपटात काजल तेंडुलकर नावाची मराठी व्यक्तिरेखा साकारणार असून हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा