हॉटेल टेंझो टेंपल, लुईसवाडी, ठाणे तर्फे धमाल आणि मस्तीभरा बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. नेहमीच स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे हॉटेल टेंझो टेंपलचा हा फेस्टिवल ५ मार्चपासून सुरू झाला असून तो १९ मार्चपर्यंत चालणार आहे. महोत्सवाचे ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. अनोखा, दिमाखदार असा हा भव्य खाद्य उत्सव (फूड फेस्टिव्हल) आहे. या आधीही टेंझो टेंपलने ठाणेकरांनी अनेक नावीन्यपूर्ण मेजवान्या दिल्या आहेत. बॉलीवूड धाबा ही तर ठाणेकर खवय्यांसाठी एक आगळी-वेगळी पर्वणीच ठरणार आहे. बॉलीवूड धाबा फेस्टिव्हलमध्ये गार्डनचे पूर्ण रूपच पालटणार आहे. हिंदी सिनेमामधील धाब्यांसारखे, धाबा फेस्टिव्हलमध्ये जेवण आणि तशीच गार्डनची सजावट हे सर्व अनुभवताना जणू आपण बॉलीवूडचे शूटिंगच पाहायला आलो आहोत, असा भास होईल. बॉलीवूड धाबा स्टाइल जेवण तसेच वातावरण. अशा या १५ दिवसांच्या धाब्याच्या जत्रेची मजा लुटायला सर्व ठाणेकर नक्कीच गर्दी करतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा