राजकारणाबरोबरच साहित्य व कला क्षेत्रालाही अग्रक्रम देणाऱ्या राजकारण्यांमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार अग्रभागी आहेत. त्यांच्या वाढदिवसाला पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करून माजी आमदार राजीव राजळे चांगला पायंडा पाडत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांनी केले. नामवंत प्रकाशनांची पुस्तके प्रदर्शनात असणार आहेत. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडी जॉगिंग पार्क येथे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान आयोजित शरद पवार बुक फेस्ट २०१२ च्या मंडप उभारणीस वाघ यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, मनपाचे विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुद्धे, बाळासाहेब जगताप, डॉ. रावसाहेब अनभुले, तसेच मुख्य संयोजक राजळे, संजय घुले, बाळासाहेब कळमकर, किशोर मरकड आदी यावेळी उपस्थित होते.    

Story img Loader