राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने येथे उद्यापासून (मंगळवारी) ६ फेब्रुवारीपर्यंत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण कथाकार व साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव, तसेच जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता याचे उद्घाटन होईल. मराठवाडय़ासह राज्यभरातील ग्रंथविक्रेत्यांचा सहभाग, शासकीय प्रकाशनांची उपलब्धता आणि साहित्यविषयक उपक्रमांची रेलचेल हे याचे वैशिष्टय़ आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आनंदनगरमधील सांस्कृतिक सभागृहात हा ग्रंथोत्सव होईल.
शहराच्या विविध शाळा-महाविद्यालयांतून ग्रंथिदडी, प्रसिद्ध कवी-गीतकार-चित्रपट अभिनेते किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व वकील रुचिर कुलकर्णी या जोडीशी मनमोकळ्या गप्पा, वैज्ञानिक जिज्ञासा जागविणारा ‘कुतूहल विज्ञानाचे’ हा कार्यक्रम, मान्यवर कवींची काव्यमैफल, विविध विषयांवरील पुस्तक खरेदी याचीही पर्वणी साहित्यरसिकांना साधता येईल.

Story img Loader