ग्रंथोत्सवात दरवर्षी सुमारे ३ ते १५ लाख ग्रंथांची विक्री होते. त्यामुळे ग्रंथ महोत्सवात गर्दीची नाही, तर दर्दीची खरी गरज असल्याचे प्रतिपादन माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी केले.
राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचानालयाच्या वतीने येथील कल्याण मंडपम येथे आयोजित तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शन व साहित्य मेळाव्याचा समारोप झाला. या वेळी बेलसरे बोलत होत्या. प्रा. विलास वैद्य, राधाकृष्ण मुळी, खंडेराव सरनाईक, उपविभागीय अधिकारी, प्रा. जगदीश कदम, विजय हवालदार आदींची उपस्थिती होती. राज्यातील ३३ जिल्ह्यांसह गोव्यातही माहिती संचालनालयाच्या वतीने ३ वर्षांंपूर्वी सुरू केलेला गंथ महोत्सव आता साहित्यिक, कवी, वक्ते यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ग्रंथोत्सव लोकचळवळ झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी लिहिलेल्या डबल बेल या पुस्तकातील काही अनुभव या वेळी सांगितले. हे काम करताना धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतावरील आदिवासींचे जीवन वाचविल्यानंतर माणुसकीची अनुभूती आल्याचे त्या म्हणाल्या.
प्रा. कदम यांनी मुलांच्या हाती दर्जेदार पुस्तके दिल्यास भविष्यात ते चांगले नागरिक बनू शकतात. असा विश्वास व्यक्त केला. वंदना सोवितकर यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader