गेल्या २५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी या प्रवासादरम्यान स्वत:च्या अनुभवांवर आधारित ‘द बेस्ट थिंग अबाऊट यू इज यू’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही’ या नावाने साकेत प्रकाशनने प्रकाशित केला.
पुस्तकात खेर यांच्या जीवनाचा आलेख आहे. यात रागाची लक्षणे, बदलाची घटना, विचारनियमन, नात्यांना जोपासणे, ताणावर विजय मिळविणे, भयमुक्त होणे, अपयश पचवणे, स्वत:मधील शक्तीला जाणणे आदी अनेक बाबींचा समावेश आहे. प्रा. पुष्पा ठक्कर यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. तुम्ही कोणत्याही वा कशाही स्थितीत असला, तरीही तुम्हाला हे पुस्तक एक आश्वासक, मर्मदृष्टिपूर्ण मार्गदर्शन करेल, असे खेर यांनी सांगितले.
आणखी वाचा