प्रेरक आणि चैतन्यदायी, बहुआयामी, असमान्य दूरदृष्टीचा नेता, योगी राजकारणी, जाणता उद्योजक, शेती आणि उद्योगक्षेत्राचा पूल, रत्नपारखी, असाधारण आकलनक्षमतेचे नेतृत्व, खंदा पाठीराखा, नवउद्योजकांचा आधारस्तंभ.. केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे हे वर्णन केले आहे देशातील ख्यातनाम उद्योजकांनी. या उद्योजकांनी पवार यांच्या उद्योगक्षेत्रातील योगदानाबद्दल लिहिलेल्या ‘उद्यमशील’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी या छोटेखानी प्रकाशन समारंभाचे प्रकाशन आयोजन करण्यात आले होते. स्वत: पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योजक अजय शिर्के, विठ्ठल मणियार यांची यावेळी उपस्थिती होती. देशातील उद्योगक्षेत्राला पवार यांच्या नेतृत्वाने दिलेले योगदान असाधारण असे असून या योगदानासंबंधी उद्योजकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या ग्रंथात करण्यात आले आहे. ‘इंडस्ट्रियस’ या इंग्रजीतील ग्रंथाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले असून संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, विश्वस्त श्रीकांत पाटील, प्रदीप कंद, तसेच सुधीर शिंदे, ग्रंथाचे संपादक अभय कुलकर्णी हेही यावेळी उपस्थित होते. या ग्रंथात राहुलकुमार बजाज, सुरेश निवोटिया, अभय फिरोदिया, वेणुगोपाळ धूत, भवरलाल जैन, किरण मुजुमदार शॉ, अजित गुलाबचंद, तुलसी तंती, बाबा कल्याणी, लीला पूनावाला, अरुण फिरोदिया, अरुण मेहता, डॉ. सायरस पूनावाला, विजय शिर्के, प्रमोद चौधरी, माधवराव आपटे, अतुल किलरेस्कर, प्रकाश छाब्रिया, अनुराधा देसाई, विठ्ठल कामत, डी. एस. कुलकर्णी, गौतम अदानी आदी अनेक उद्योजकांचे लेख या ग्रंथात आहेत. या सर्वानी पवार यांचे व्यक्तिमत्त्व उद्योजकांच्या दृष्टिकोनातून उलगडवून दाखवले आहेत.
शरद पवार यांच्याविषयीच्या ‘उद्यमशील’ ग्रंथाचे प्रकाशन
प्रेरक आणि चैतन्यदायी, बहुआयामी, असमान्य दूरदृष्टीचा नेता, योगी राजकारणी, जाणता उद्योजक, शेती आणि उद्योगक्षेत्राचा पूल, रत्नपारखी, असाधारण आकलनक्षमतेचे नेतृत्व, खंदा पाठीराखा, नवउद्योजकांचा आधारस्तंभ.. केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे हे वर्णन केले आहे देशातील ख्यातनाम उद्योजकांनी. या उद्योजकांनी पवार यांच्या उद्योगक्षेत्रातील योगदानाबद्दल लिहिलेल्या ‘उद्यमशील’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
आणखी वाचा
First published on: 16-12-2012 at 12:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book release on sharad pawars life