स्वर्गीय लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी वाचन संस्कृती निर्माण केली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत समाजामध्ये ती अधिक वाढीस लागावी या उद्देशाने कराड अर्बन बँक आणि नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे ज्येष्ठ संचालक व वाचन चळवळ समितीचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी केले.
मसूर (ता. कराड) येथे या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वांतत्र्यसैनिक बाबुराव किवळकर होते. कराड अर्बनचे प्रशासन विभाग प्रमुख माधव माने, सेवक संघ अध्यक्ष दिलीप चिंचकर,
सरपंच दिनकरराव शिरतोडे, उद्योजक बच्चुभाई शहा, अॅडव्होकेट . रणजितसिंह जगदाळे यांची यावेळी उपस्थिती होती.
बच्चुभाई शहा म्हणाले की, वाचनाने वैचारिक क्रांती घडते त्यासाठी संस्काराने भारीत असलेल्या अर्बन कुटुंबाने या रूपाने नवीन दालन आपणासमोर ठेवले आहे. त्याचा लाभ घ्यावा.
दिनकरराव शिरतोडे यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अर्बनने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले.
साहित्यिक लालासाहेब अवघडे, ज्येष्ठ स्वांतत्र्यसैनिक बाबुराव किवळकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवेश्वर चेणगे यांनी केले. डी. ए. भोज, अनिल जेधे, प्रकाश माळी, प्रा. कादर पिरजादे, दिलीप पाटील, गणेश जाधव, महेश जगदाळे, विनोद शहा यांच्यासह अनेक नागरिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचा लाभ घ्या- गोखले
स्वर्गीय लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी वाचन संस्कृती निर्माण केली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत समाजामध्ये ती अधिक वाढीस लागावी या उद्देशाने कराड अर्बन बँक आणि नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे ज्येष्ठ संचालक व वाचन चळवळ समितीचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-11-2012 at 02:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books is on your home this scheme should be take by everybody says gokhle