सावित्रीबाई फुले जयंती आणि भीमा-कोरेगाव येथील भीमसैनिकांना आंबेडकरी संघटना आणि शैक्षणिक संस्थांनी मानवंदना दिली. कुंभलकर समाजकार्य सांध्यकालीन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विलास धबाले, खुशाल मेले, डॉ. विनायक साखरकर आदींनी सावित्रीबाईंच्या छायाचित्राला पुष्प वाहिले. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे कॉटन मार्केटमधील सावित्रीबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप तांदळे, सुनंदा साठे, अंजना मेश्राम, कमलेश वासनिक, सतिश ढोरे आदी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख अरुण फुलझेले, अशोक वासनिक, बंडू सरोवर, अबसार मुशरफ, मनोज गौर, धर्मराज आवळे आणि गौतम पाटील आदी उपस्थित होते. महात्मा फुले संस्थेतील सावित्रीबाई फुले स्मारकास शिक्षक आमदार नागो गाणार व समाजसेविका मंदा हिवसे यांनी पुष्पहार घातला. याप्रसंगी शिक्षक संस्थेचे संचालक मंडळ तसेच सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुरळकर वाचनालयातील शिक्षक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
 चिचोलीतील समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण केंद्रातर्फे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीमसैनिकांना मानवंदना देण्यात आली. भारतीय रिपब्लिकन परिषदेच्यावतीने भीमा कोरेगावच्या रणसंग्रामात भीम शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी संविधान चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जनार्दन मून, असंघ रामटेके, सुरेश पानतावणे, नरेश बोदेले, भीमराव मून आदी उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने भीमा कोरेगाव येथील शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. ताराचंद्र खांडेकर, थॉमस कांबळे, इ.मो. नारनवरे, अरुण गजभिये, भगवानदास भोजवानी, एम.बी. राऊत आणि बबन चहांदे आदी यावेळी उपस्थित
होते.
रिपब्लिकन पँथर्सतर्फेही शहिदांना मानवंदना देण्यात आली. प्रसंगी संघटनेचे डॉ. सत्यप्रकाश सोनटक्के, देवानंद म्हैस्कर, दिनेश अंडरसहारे, अॅड. मिलिंद खोब्रागडे, अॅड. संजय नगरारे आणि उत्तम पाटील आदी यावेळी उपस्थित
होते.