चंदिगड व जयपूर येथे झालेल्या वकिलांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नगरमधील वकिलांनी आज पूर्ण  दिवस न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नाही. न्यायालयासमोरील आजच्या सर्व सुनावण्यांवर पुढील तारीख देण्याची विनंती करणारे अर्जही पक्षकारांनीच सादर केले.
बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने दिल्ली वगळता सर्व वकिल संघटनांना आज कामकाजात सहभागी न होण्याच्या सूचना  दिल्या होत्या. त्यानुसार शहर वकिल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे, मंगेश दिवाणे, अनिल सरोदे, सुधीर बाफना, राजेंद्र सेलोत, युवराज पाटील, भाऊसाहेब घुले आदींनी प्रधान जिल्हा न्यायाधिशांना कामकाजात सहभागी होणार नसल्याचे निवेदन दिले. तसेच सर्व न्यायाधिशांची भेट घेऊन संघटनेच्या निर्णयांची माहिती दिली.

Story img Loader