येथील नवीन नगर रस्त्यावर असणारी एक सदनिका फोडून चोरटय़ांनी तीस हजारांचा ऐवज लंपास केला. घरातील रोकड व दागदागिने इतरत्र ठेवल्याने मोठी चोरी टळली. दिवसाढवळ्या व शहरातील सर्वात गजबजलेल्या नवीन नगर रस्त्यालगत आज दुपारी चोरीची घटना घडली.
मर्चंट बँकेसमोरील एका इमारतीत सीताराम शिंदे यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. कार्यक्रमासाठी ते कुटुंबासह घराला कुलूप लावून गावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी कडीकोयंडा तोडत फ्लॅटमध्ये प्रवेश मिळविला. सामानाची उचकापाचक करत दागिने व रोख रक्कम असा मिळून तीस हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती मिळाली.

Story img Loader