नेरुळमध्ये सुरू असलेला कुंटणखाना नवी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने नुकताच उद्ध्वस्त केला आहे. यात वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या ९ महिलांची आणि मुलींची सुटका करून त्यांची रवानगी चेंबूर येथील महिला सुधारगृहात केली आहे. या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांर्तगत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवणे, सेक्टर ९ मधील हरबंश अपार्टमेंटच्या पहिला मजल्यावरील रूम १०१ मध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांना मिळाली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक, साहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत धुरी यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी बनसोडे यांच्या पथकाने छापा मारला. या पथकात पोलीस हवालदार मेघराज देवरे, महेश वायकर, अरुण राक्षे, संगीता चौधरी, जगदीश पाटील, पोलीस नाईक अश्विनी चिपळूणकर, विकास जाधव आणि पोलीस शिपाई पल्लवी देशमुख आदींचा समावेश होता. या प्रकरणी राजेश कमल यादव आणि लखन कुंजो यादव या दोघांना अटक केली आहे. त्यांचा साथीदार छोटू यादव याचा शोध सुरू आहे. हे तिघेही त्यांना संपर्क करणाऱ्या ग्राहकांसोबत यात सुटका करण्यात आलेल्या महिलांना आणि मुलींना पाठवत लॉजमध्ये पाठवत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेरुळमधील कुंटणखाना समाजसेवा शाखेकडून उद्ध्वस्त
नेरुळमध्ये सुरू असलेला कुंटणखाना नवी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने नुकताच उद्ध्वस्त केला आहे. यात वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या ९ महिलांची आणि मुलींची सुटका करून त्यांची रवानगी चेंबूर येथील महिला सुधारगृहात केली आहे.
First published on: 04-07-2014 at 02:34 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brothel in nerul destroyed by social branch