बीएसएनएलने कृषी व इतर सर्व योजनांमधील ग्राहकांचे सेवा बंद ठेऊन ग्राहकांना ऐन दिवाळीत मनस्ताप दिला. सिमकार्डचे पैसे शिल्लक असतानाही ही सेवा बंद ठेऊन केवळ नियमित ग्राहकांचीच सेवा चालू ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेचे दिपक शहाणे  यांनी या गोष्टीचा निषेध केला.
आज दिवाळीचा महत्वाचा सण असताना सकाळपासून बीएसएनएलच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाखो ग्राहकांचे फोन अचानक बंद झाले. फोन लावला की ‘आपल्याकडे पुरेसा बॅलन्स नाही’ असे उत्तर येत होते. दिवाळीसाठी या एक दोन दिवसातच अनेकांनी बॅलन्स टाकलेला होता, मात्र त्यांनाही असेच उत्तर मिळाले. या प्रकाराने गोंधळलेल्या ग्राहकांनी या कार्यालयात धाव घेऊन चौकशी चौकशी केली असता केवळ व्यवसाय वाढवा म्हणून कंपनीने विविध योजानांमधील समिकार्डची सेवाच बंद ठवेल्याचे समजले. ग्राहक काही लाभ मिळावा म्हणुनच या योजनांमध्ये सहभागी झाले, मात्र महत्वाच्या दिवशी त्यांची सेवा बंद करण्यात आली. याविरूध्द काही ग्राहक न्यायालयात देखील जाण्याच्या तयारीत आहेत.