महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा १८ फेब्रुवारीला होणार आहे. महापौरांसह अन्य पदाधिकारी व नगरसेवक यांच्यासाठीच्या तब्बल १२ कोटी २५ लाख रूपयांचा बोजा असलेल्या अंदाजपत्रकाला या सर्वसाधारण सभेत मान्यता घेतली जाईल. सत्ताधारी तर नाहीच पण विरोधी नगरसेवकांकडूनही अंदाजपत्रकाला विरोध होणार नाही याची काळजी नगरसेवकांसाठी प्रत्येकी १० लाख रूपयांची प्रभाग विकास निधीची तरतूद करून घेण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांसाठी ४ कोटी, उमहापौरांसह स्थायी समिती सभापती, महिला बाल कल्याण समिती सभापती, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते यांच्यासाठी प्रत्येकी २५ लाख रूपयांच्या शहर विकास निधीची तरतुदही लिलया मंजूर होऊन जाणार आहे. तब्बल ४०९ कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पात दोन दिवसात फक्त काही तासांची चर्चा करून समितीकडून याच काय त्या दुरूस्त्या सुचवण्यात आल्या. प्रशासनाने स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतानाच मनपाची आर्थिक स्थिती जकात बंद झाल्यामुळे खराब आहे, त्यामुळे वास्तवाचा विचार करूनच दुरूस्त्या सुचवाव्यात असे स्पष्ट केले होते, त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून सुरू असलेल्या कामांवरच लक्ष केंद्रीत करून असे सुचवले होते. मात्र या सर्व सुचना व वास्तवता धाब्यावर बसवत स्थायी समितीने विशेष निधींसह मनपावर बोजा पडणाऱ्या अनेक दुरूस्त्या अर्थसंकल्पात करून तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आणला आहे.ो

Story img Loader