जुन्या आणि त्याच त्याच घोषणांच्या अंमलबजावणीचे आश्वासन देणारा आणि ठाणे, कळवा, मुंब्रा यांसारख्या शहरी भागांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद बाळगणारे, परंतु केवळ कागदावरच राहिलेले विकास प्रकल्प यंदा प्रत्यक्षात उतरतील, असा दावा करणारा ठाणे महापालिकेचा येत्या वर्षांचा सुमारे १९०० कोटी रुपयांच्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त आर. ए. राजीव यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभापती रविंद्र फाटक यांच्यापुढे सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची करवाढ प्रस्तावित करण्यात आली नसून भांडवली मूल्यावर आधारित अशा नव्या मालमत्ता करप्रणालीचा नादही प्रशासनाने सोडून दिल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वर्षांनुवर्षे पायाभूत सुविधा आणि विकासापासून दूर राहिल्याने अवकळा आलेल्या कळवा आणि मुंब्रा परिसराचा कायापालट घडवू शकणाऱ्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचा समावेश या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा