परभणी शहरात फेरोज टॉकीज, जनता मार्केट, राजगोपालचारी उद्यान, जुना मध्यवर्ती नाका, जुनी नगरपालिका व अपना कॉर्नर या ठिकाणी ‘बीओटी’ तत्त्वावर व्यापारी संकुले उभारण्यास गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. याच बठकीत आमदार-खासदार स्थानिक विकास निधीतून करण्यात येणाऱ्या सात कामांना मंजुरी दिली.
बी. रघुनाथ सभागृहात महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपायुक्त दीपक पुजारी, उपमहापौर सज्जुलाला, नगरसचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी बांधावयाच्या व्यापारी संकुलांमध्ये महिला बचतगटांनाही प्राधान्य देण्याची सूचना नगरसेविका रेखा कानडे यांनी केली. वरील सर्व संकुलांपकी राजगोपालाचारी उद्यानालगत होणारे संकुल सर्वात मोठे असून १०५ गाळे, तसेच पहिल्या मजल्यावर आणखी १०५ गाळे असतील. तब्बल २१० गाळे असलेले हे संकुल असेल. या ठिकाणी पार्किंगलाही जागा उपलब्ध केली जाईल, अशी माहिती महापौर देशमुख यांनी दिली. या संकुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने विकासकामांना आमचे नेहमीच सहकार्य राहील, असे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले.
आमदार-खासदार विकास निधीतून खानापूर फाटा ते िशदे यांच्या घरापर्यंत, सुपर मार्केट ते स्पंदन हॉस्पिटल डांबरीकरण, गौतम नगरमध्ये सार्वजनिक शौचालय, स्नानगृहाचे बांधकाम, पंचशीलनगरात सार्वजनिक सभागृह बांधकाम आदी सात कामांना मान्यता देण्यात आली. जनता मार्केटमध्ये अद्ययावत फिश मार्केट उभारणीस मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या राजीव आवास योजनेचा प्रस्ताव सादर करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. या योजनेंतर्गत शहरात १४ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. शहरात ७१ ‘स्लम एरिया’ असून, ही लोकसंख्या ३ लाखांपेक्षा जास्त असल्याने राजीव आवास योजनेत शहराचा समावेश होऊ शकतो, असे सांगण्यात आले. शहरातील उद्यानांसाठी ३ वाहन खरेदीसही मान्यता देण्यात आली. मराठवाडा हायस्कूलजवळील व्यापारी संकुलावर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम, कडबी बाजारमध्ये संकुलाचे बांधकाम, सेंटर नाका येथे ७० गोदामांचे बांधकाम, कर्मचाऱ्यांसाठी २० क्वॉर्टर बांधण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. वाघमारे, नगरसेवक अतुल सरोदे, दिलीप ठाकूर, हसीबुर रहेमान, सुनील देशमुख, शिवाजी भरोसे, रेखा कानडे, शाम खोबे, अॅड. जावेद कादर आदींनी चच्रेत भाग घेतला.
वृक्ष प्राधिकरण समिती गठीत
मनपा क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. आयुक्त हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून समितीत दहा मनपा सदस्य व पाच नामनिर्देशन सदस्य राहणार आहेत.
परभणीत ‘बीओटी’ तत्त्वावर ८ व्यापारी संकुले उभारणार
परभणी शहरात फेरोज टॉकीज, जनता मार्केट, राजगोपालचारी उद्यान, जुना मध्यवर्ती नाका, जुनी नगरपालिका व अपना कॉर्नर या ठिकाणी ‘बीओटी’ तत्त्वावर व्यापारी संकुले उभारण्यास गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
First published on: 08-11-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Build 8 commercial building on bot base in parbhani