बुलढाणा अर्बन व नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या येथील दिवं. पंडीत कानडे शास्त्री उद्यानात लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मिनी रेल्वे गाडीचे व उद्यानातील विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष उज्वला काळवाघे, उपाध्यक्ष हेमंत खेडेकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले, संजय गायकवाड, पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती विमल सावळे, पुरुषोत्तम हेलगे, बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष राधेश्याम चांडक, संस्थेचे संचालक राजेश देशलहरा प्रामुख्याने उपस्थित होते.
बुलढाणा अर्बनने उद्यानात लहान मुलांसाठी मिनी रेल्वे ट्रेन सुरू केली असल्याचे सांगून संपूर्ण विदर्भात बुलढाणा व शेगांव येथेच अशा प्रकारची ट्रेन सुरू आहे. यापुढे या उद्यानात लहान मुलांसाठी व वृध्दांसाठी आणखी विविध साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच संपूर्ण परिसर निसर्गरम्य करण्याचा मानस असल्याचे राधेश्याम चांडक यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेने सामाजिक उपक्रमांतर्गत शहरातील स्मशानभूमी विकसित करण्याबरोबरच स्वर्गरथाची व शहरवासीयांसाठी रात्री-अपरात्री विनामूल्य रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गरजूंनी संस्थेच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल येवले यांनी बुलढाणा संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतूक करून कुठलाही असा उपक्रम तडीस नेऊन तो यशस्वी करणारी बुलढाणा अर्बन महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे सांगितले. बुलढाणा अर्बन पंधरा वष्रे हे उद्यान चालविणार आहे, मात्र यासाठी भविष्यात बुलढाणा अर्बनला वाढीव मुदत देण्याचा सवरेतोपरी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाला बुलढाणा अर्बन संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल संस्थेचे कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय कुळकर्णी यांनी केले.

Story img Loader