पुणे महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे चार हजार १६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत गुरुवारी रात्री एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी पक्षपाती, बोगस, फुगवटा केलेले, कधीही अस्तित्वात न येऊ शकणारे आणि फक्त कोथरूडसाठी तयार केलेले अंदाजपत्रक अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अंदाजपत्रकाची लक्तरे काढली.
अंदाजपत्रकावर सोमवारी आणि गुरुवारी असे दोन दिवस झालेल्या चर्चेत ४६ नगरसेवकांनी भाग घेतला आणि बारा तास ही चर्चा चालली. राष्ट्रवादीच्या तीन-चार नगरसेवकांनी केलेली भाषणे वगळता उर्वरित सर्व नगरसेवकांनी अंदाजपत्रकाचे वाभाडे काढले.
अंदाजपत्रकातील पक्षपातीपणावर सभेत कठोर टीका झाली. तसेच अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी स्वत:ची विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन फक्त कोथरूड मतदारसंघासाठी केलेली दीडशेहून अधिक कोटी रुपयांची तरतूद, विरोधी नगरसेवकांना देण्यात आलेली अत्यल्प तरतूद या मुद्दय़ांवरूनही चांदेरे यांच्यावर अनेक आरोप नगरसेवकांकडून करण्यात आले.
हरणावळ यांचे भाषण गाजले
अंदाजपत्रकावरील चर्चेला गुरुवारी हेमंत रासने यांनी प्रारंभ केला. फुगवटय़ाचे असल्यामुळे अंदाजपत्रकातील १९०० ऐवजी फक्त ९०० कोटींचीच कामे होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. हे फक्त लोकानुनयाच्या योजनांचे अंदाजपत्रक आहे, अशी टीका संजय बालगुडे केली.
शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ यांनी अंदाजपत्रकावर सडकून टीका केली. त्यांचे आक्रमक भाषण चांगलेच गाजले. अंदाजपत्रकातील अनेक तरतुदींमधील फोलपणा त्यांनी दाखवून दिला. अत्यंत बोगस आणि कधीही अस्तित्वात न येणारे अंदाजपत्रक अशा शब्दांत अशोक येनपुरे यांनी टीका केली, तर डॉ. सिद्धार्ध धेंडे यांनीही टीका करताना एबीटीचे उत्पन्न नक्की किती हेच माहिती नसल्याचा आक्षेप यावेळी घेतला.
सभागृहनेता सुभाष जगताप यांनी या अंदाजपत्रकाने नगरसेवकांवर उत्पन्नवाढीची जबाबदारी दिली असल्याचा मुद्दा मांडला, तर चांदेरे यांनी सर्व भागांना समान न्याय दिल्याचे अंदाजपत्रकावरील भाषणांना उत्तर देताना
सांगितले.
लक्तरे निघालेले, फुगवटय़ाचे अंदाजपत्रक मंजूर
पुणे महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांचे चार हजार १६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत गुरुवारी रात्री एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी पक्षपाती, बोगस, फुगवटा केलेले, कधीही अस्तित्वात न येऊ शकणारे आणि फक्त कोथरूडसाठी तयार केलेले अंदाजपत्रक अशा शब्दांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अंदाजपत्रकाची लक्तरे काढली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-03-2013 at 04:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bulge budget sanctioned