वसई-विरार महानगर परिवहन सेवेतर्फे नालासोपारा-चंदनसार तसेच नालासोपारा-वसई तहसीलदार कचेरी या दोन नव्या बससेवा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर, सभागृह नेते उमेश नाईक, उपमहापौर समीर डांगे, स्थायी समिती सभापती नारायण मानकर, परिवहनप्रमुख भरत गुप्ता यांच्या उपस्थितीत नववर्षांच्या शुभ मुहूर्तावर नालासोपारा (पूर्व) येथे समारंभपूर्वक चंदनसार बसचे उद्घाटन करण्यात आले. डिसेंबर महिन्यात नालासोपारा हायवे फाटा ते सोपारा गाव व इतर आवश्यक मार्गावर बससेवा सुरू होणार आहे. दर दहा मिनिटांनी बस प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

Story img Loader