माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करणारे क्विकहिल टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश काटकर व तांत्रिक संचालक संजय काटकर यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखविणारा ‘बिझनेस गप्पा’ हा कार्यक्रम ३१ जानेवारी रोजी केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित केला आहे. प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ व अमृतवेल बिझनेसचे संपादक सुधीर जोगळेकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. अमृतवेल पब्लिकेशन, सायबर, भारती विद्यापीठ, कोल्हापूर आयटी असोसिएशन व कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याचा काळ कल्पक बिझनेसचा असून माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाने असे अनेक उद्योग विकासास आले असून, अशा प्रकारे संशोधन करून अँटीव्हायरस क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या काटकर बंधूंचा प्रवास नव्या पिढीस मार्गदर्शक ठरणार आहे, हे लक्षात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे अमृतवेल पब्लिकेशनचे संपादक धर्मेन्द्र पवार यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Business gappa programme on 31 jan in kolhapur